मनसेच्या नेत्याला सरकाने केले तडीपार… वाचा कोण आहे तो नेता ?

ठाणे, ३१ जुलै २०२०: महाराष्ट्रात आक्रमक आंदोलनासाठी मनसेची खास ओळख आहे आणि त्यातच नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीत ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्षासाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून तडीपारीचे आदेश देण्यात आले आहे. वसई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी ठाण्यामध्ये महापालिकेबाहेर आंदोलन करत असतानाच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली.अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी दिले आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता यावर काय भूमिका घेतात हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.

“ठाण्यात एवढे गुंड आहेत ते हद्दपार होत नाहीत, पण मी गेली अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी आंदोलन करतोय, लोकांसाठी कोणी भांडायचं नाही का? माझी पहिली सभा झाली तेव्हा मला एक कोटींचा दंड लावला होता.आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे.” असे म्हणत त्यांनी फेसबूक लाईव द्वारे त्यांचा संताप व्यक्त केला .

एवढेच नव्हेतर “कोरोनाच्या काळात नागरिकांच्या हक्कासाठी, आरोग्यासाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे. ह्याच कामाचं बक्षीस म्हणून सरकारने मला जिल्हा तडीपारीची नोटीस पाठिवली आहे. अशा विचारांची गुंडगिरी नक्की कोणाची?” असे ट्विट त्यांनी त्याच्या ऑफिशीयल ट्विटर अकाउंट वरून केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा