कल्याण डोंबिवलीत मनसे आमदार सक्रीय … सरकारकडे मागण्यांवर मागण्या…..

डोंबिवली, २२ ऑगस्ट २०२० : कल्याण डोंबिवलीत गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे गेल्या गेल्या काही महिन्यापासून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहेत . कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत जातोय आणि अशा परिस्थितीत लोक प्रतिनीधी म्हणून राजू पाटील हे नागरिकांच्या मदतीला उभे आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करा अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले आहेत . त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची बिले माफ करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रीपुला बद्दल तसेच केडीएमसीतील दुकाने सूरू करण्याबाबत तसेच कोकणात चाकरमान्यांना जास्तीच्या गाड्या सोडण्याबाबत सरकारकडे मागण्या केल्या होत्या आणि त्या पूर्ण देखील झाल्या होत्या.

या लॉकडाउनच्या काळात मनसे आमदार राजू पाटील हे कल्याण डोंबिवलीत चांगलेच सक्रीय होते . त्यामुळे आता या मागणीवर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचे आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा