मनसेच्या स्वप्नपूर्ती रॅलीला पोलिसांकडून परवानगी नसल्यानं कार्यकर्त्यांची धरपकड

छत्रपती संभाजीनगर, १६ मार्च २०२३: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज स्वप्नपूर्ती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला पोलिसांकडून परवानगी नसतानाही मनसे सैनिकांकडून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं मनसे सैनिकांकडून ठरलेल्या मार्गानं रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, रॅलीला परवानगी नसल्यानं रॅलीत सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं असून कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येतंय.

छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ संस्थान गणपती राजाबाजार ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य स्वप्नपूर्ती रॅलीला परवानगी नाकारण्यात आली असल्याचं पोलिसांकडून कळवण्यात आलंय. तसंच सार्वजनिक शांतता भंग होईन, असं कृत्य किंवा सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी कोणतेही रॅली व इतर आंदोलन करु नये तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करू नये. अन्यथा योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा सिटी चौक पोलिसांकडून देण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा