अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेची जागर यात्रा

रायगड, २७ ऑगस्ट २०२३ : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेतर्फे रायगडमध्ये आज जागर यात्रा काढण्यात आली आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले आहे. आता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत. मात्र, यापुढची यात्रा शांततेत नसणार, असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला आहे. तसेच आमच्यावर काय केसेस करायचे ते करा. जागे व्हा, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

पळस्पे ते मानगाव अशी १६ किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत सहभाग झाले. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे. तर या पदयात्रेच्या समारोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर यावेळीते उपस्थिताना संबोधितही करणार आहेत.

यात्रेत सहभागी झालेले अमित ठाकरे म्हणाले, आपण चंद्रावर स्वस्तात पोहोचलो. अवघा ६०० कोटींचा खर्च आला. मात्र, जवळपास १५ हजार कोटी खर्च करूनही गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय. आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत.

दुसरीकडे तरणखोप ते कासू कोकण जागर पदयात्रेला सुरुवात झाली आहे आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली आहे. संगमेश्वरहून मनसे नेते श्री.दिलीप धोत्रे ह्यांच्यासह श्री.किशोर शिंदे , श्री.अजय शिंदे, श्री.संदेश नाईक, श्री.रोहन सावंत सहकारी महाराष्ट्र सैनिक व नागरिकांसह यात्रा चालू आहे. निवळीहून (रत्नागिरी) मनसे नेते श्री.संदीप देशपांडे, मनसे नेते श्री.अविनाश जाधव ह्यांच्यासह श्री.मनोज चव्हाण, तर लांजाहून मनसे नेते श्री.अविनाश अभ्यंकर ह्यांच्यासह श्री.नयन कदम, श्री.सतीश नारकर, श्री.गजानन राणे हे नेते आहेत. तर नागोठण्याहून मनसे नेते व आमदार श्री.राजू पाटील, श्री.राजेंद्र वागस्कर आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा