पँगोंग क्षेत्रात पहिल्यांदाच मोबाइल सुविधा सुरू…

पँगोंग ६ मार्च २०११: गेल्या वर्षभरापासून चीन आणि भारत, सीमेवर वादाचा भाग बनलेला पँगोंग क्षेत्रात मोबाइल सुविधा सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या भागात कोणतीही मोबाईल सेवा उपलब्ध नव्हती त्यामुळे हा भाग कनेक्टिविटी च्या बाबतीत भारताच्या इतर भागांपासून वेगळा राहिला होता. ही सुविधा सुरू झाल्यावर लडाख मधील पँगोंग गावातील लोक आनंदाने भारावून गेले होते.

या क्षेत्रात सुरू झालेल्या मोबाईल सेवेमुळे येथील नागरिक भारावून गेले होते. अक्षरशः संगीत आणि मृत्य करून मोबाईल सेवेचे स्वागत येथील नागरिकांनी केले. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील तलावाच्या आजूबाजूच्या टेकड्या तसेच उंचावरील भागावर भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू आहे.

लडाख मध्ये पँगोंग तलावाच्या जवळपास मेरक गाव आणि आसपासच्या क्षेत्रांमध्ये पहिल्यांदाच बीएसएनएलच्या मार्फत मोबाईल सेवा पुरवण्यात आली. याकरिता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने या भागात टॉवर बसवले आहे. टॉवर्स केवळ तेथील स्थानिक नागरिकांनाच जगातील इतर भागांना जोडणार नाही तर दोन सैन्य आणि अर्धसैनिक बड्डे, थकुंग आणि ज्ञानसिह थापा पोस्ट देखील एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत.

मोबाईल सेवा सुरु होण्याच्या प्रसंगावर चुशुल येथील स्थानिक नेते काँचुक स्टॅनजिन म्हणाले की, १९४७ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रामध्ये मोबाईल सुविधा सुरू करण्यात आली आहे. सैन्य आणि अर्धसैनिक तुकडीसह त्यांनी स्वतः या मोबाईल सुविधा चे उद्घाटन माराक येथे केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा