गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे “मोदी सरकारची आर्थिक जादू! जीएसटीपासून गरीबी निर्मूलनापर्यंत भारताची झेप चौथ्या क्रमांकावर”

“मोदी सरकारची आर्थिक जादू! जीएसटीपासून गरीबी निर्मूलनापर्यंत भारताची झेप चौथ्या क्रमांकावर”

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेला नवा वेग आणि दिशा मिळाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयांमुळे देशात आर्थिक क्रांती घडून आली आहे. जीएसटीची सुधारित रचना, ज्यात आता चारऐवजी फक्त दोनच टप्पे असतील, ही सामान्य नागरिकांसाठी मोठी ‘दिवाळी भेट’ ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विश्वास पाठक यांच्या मते, मोदी सरकारमुळे २५ कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले आणि भारताची अर्थव्यवस्था आता जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. स्वातंत्र्यानंतर आर्थिक सुधारणांचा वेग मंदावलेला असतानाच मोदींच्या नेतृत्वात तो दुपटीने वाढल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पारदर्शक धोरणे आणि सुसूत्र कार्यपद्धतीमुळे भारताची आर्थिक ताकद आज जागतिक मंचावर ठळकपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version