नवी दिल्ली : मोदी सरकार सैन्यांना राजकारणात ओढत आहे. असा आरोप देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी करत सैन्य दले स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवतात आणि आम्ही सरकारच्या आदेशांनुसार काम करतो. असेही ते म्हणाले.
काँग्रेसने रावत यांच्या वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने त्यांच्या सीडीएस म्हणून नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर रावत यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
पत्रकारांशी बोलताना रावत म्हणाले की, लष्कर, वायुदल आणि नौदल एक टीम म्हणून करेल. सीडीएस सैन्य दलांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम करणार असून, आम्ही एकजुटीने कारवाई करू. संरक्षण दलांना मिळालेल्या संसाधनांचा सर्वोत्तम वापर करण्यावर आपला भर असेल.
सीडीएस बिपिन रावत यांनी बुधवारी आपला कार्यभार हाती घेतला. त्यापूर्वी रावत यांनी युद्ध स्मारक स्थळावर जाऊन शहिदांना वंदन केले. या वेळी त्यांच्यासोबत नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, एअर चीफ मार्शल राकेश भदोरिया आणि नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग उपस्थित होते. देशाच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला तीनही सैन्य दलांनी सलामी दिली.