नवी दिल्ली, दि. १३ जून २०२०: देशातील कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत आहे. दररोज कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीसंदर्भात सलग दोन दिवस वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही बैठक १६ जून आणि १७ जून रोजी होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. मोदींची हि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दोन्ही दिवस दुपारी ३ वाजता सुरू होईल.
१६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांची / केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद साधणार आहेत , जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण खूप चांगले आहे. या राज्यांमध्ये पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड आणि झारखंड अशा अनेक राज्यांचा समावेश आहे.
१७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील, जिथे कोरोना विषाणूचा संसर्ग दर खूप जास्त आहे. १७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत अनेकवेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अनेकदा लॉकडाऊन वाढविण्यासाठी, काही आर्थिक उपक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































