स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती सुरू होणार सी-प्लेन सुविधा, मोदी करणार उद्घाटन

साबरमती, २६ ऑक्टोबर २०२० : ३१ ऑक्टोबरला गुजरातला नवीन भेट मिळणार आहे. अहमदाबाद-आधारित साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान समुद्री विमानसेवा सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्‍टोबरला याचं उद्घाटन करणार आहे.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये असतील, त्या दरम्यान ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ते साबरमती रिव्हरफ्रंट पर्यंत सी प्लेन’नं प्रवास करतील. ही देशातील पहिली समुद्र-विमान सेवा असंल.

३१ ऑक्टोबरपासून १९ सीटर सी-प्लेन दररोज ४ उड्डाण करंल. त्याचं भाडं प्रति व्यक्ती ४८०० रुपये ठेवण्यात आलं असून सी-प्लेन सरदार सरोवर धरणाच्या तलाव क्रमांक ३ मध्ये उतरंल.

‌ सी-प्लेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मोजला जातो. याची सुरुवात पंतप्रधानांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केली होती, परंतु आता त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीशी जोडले गेले आहे.

नुकतेच हे सी-प्लेन मालदीवहून कोचीला पोहचलं, त्यानंतर आता ते गुजरातमध्ये आलं आहे. याची प्रारंभिक सेवा केवडिया ते अहमदाबाद दरम्यान राहील. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबाद आणि केवडिया येथे सी-प्लेनसाठी जेटी बांधण्याचं काम चालू होते आणि इतर सर्व तयारी सुरू होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा