मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला शेतकऱ्यांचा दणका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारी अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पैसा नुकसंग्रस्तब शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. याच संदर्भामध्ये पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी शेतकऱ्यांनी आज उधळून लावली.
पालघर पंचायत समितीमध्ये उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘बुलेट ट्रेन’च्या संदर्भात सुनावणी लावण्यात आली होती. या सुनावणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे लेखी निवेदन न देता सुनावणी लावण्यात आल्याने शेतकऱ्यांनी ही सुनावणी उधळून लावली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी मुंबईपासून जवळपास १४० किलोमीटर दूर पालघर जिल्ह्यामध्ये २८८ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, या निर्णयाला भूमिधारक शेतकऱ्यांचा या भूसंपदनाला विरोध आहे.

सत्तास्थापनेच्या गोंधळात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस एकत्र येऊन राज्यात सत्तास्थापनेचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन करताना आणि सरकार चालवताना तिन्ही पक्षांचा समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती स्थापना करण्यात येईल. या नव्या सत्ता-समिकरणाच्या अजेंड्यात ‘बुलेट ट्रेनला विरोध केला जाईल आणि तो पैसा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला जाईल’ असा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती शेतकऱ्यांकडू देण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा