गोल पोस्ट महाराष्ट्र पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत

पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी (दि.६)रोजी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले.यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार संजय काकडे, आमदार सर्वश्री भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, एअर कमोडोर राहूल भसीन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग आहुजा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version