नवी दिल्ली, दि. २७ जुलै २०२०: काल रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील नागरिकांना सकाळी “मन कि बात” या कार्यक्रमात संबोधित करत होते.यामध्ये त्यांनी कारगिल विजय दिना विषयी बोलत पाकिस्तानवरही हल्ला बोल केला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मन की बात मधून सदर भाष्य केले आहे.
कोरोना संकट संपलेले नाही….
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “मन कि बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असताना म्हणाले कि, ‘देशातील कोरोना परिस्थिती हि अजून ही ठिक नसून, कोरोनाचे संकट संपलेेले नाही. तसेेच देशातील नागरिकांनी देखील काळजी घेत सतर्क राहिले पाहिजे .’ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे इतर देशापेक्षा भारतात मोठ्या प्रमाणात आहे.तर मृत्यूदर देखील कमी आहे ,असेही ते म्हणाले.
१५ ऑगस्ट रोजी करु संकल्प…..
येत्या १५ ऑगस्टला कोरोनापासून स्वांतत्र्य मिळवण्यचा संकल्प करु असेही ते या “मन कि बात” कार्यक्रमात म्हणाले.तसेच कोरोना व्हायरसच्या काळात जी काही यंत्रणा कार्य करत आहे अश्या यंत्रणेंचे देखील त्यांनी कौतुक केलं. तर ग्रामीण भागात छोट्या व्यवसायांनी चांगले कार्य केले म्हणून त्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्सहन देखील दिले.
मास्क वापरु वाटत नाही तर यांचा विचार करा…..
कोरोना काळात अनेक लोक बाहेर अजूनही निर्धास्तपणे फिरत असून कोणतीही खबरदारी ठेवत नाही अशा लोकांसाठी मोदींनी” मन कि बात” मधे एक गोष्ट सांगितली आहे. अनेकांना मास्क घालण्यात कंटाळा येतो तर अनेक जणांना काढून ठेवावा वाटतो. अशा लोकांनी एकदा फक्त आरोग्य कर्मचारी, डाॅक्टर, नर्स यांचे स्मरण करा, जे दिवसभर फक्त मास्क घालूनच नाही तर संपुर्ण पीपीईकिट परिधान करुन दिवस भर कोरोना रुग्णांची सेवा करतायेत तर या युद्धात फ्रंट लाईनवर कार्य करतायेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.तर भारतीय सैनिकांना मनस्ताप होईल असे कुठलेही कृत्य करु नका असे देखील ते बोलले. त्या बरोबरच कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये लोकांनी कशा पद्धतीने राहिले पाहिजे याचे “मन कि बात” या कार्यक्रमातून त्यांनी मार्गदर्शन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी