अखेर मान्सून भारतात दाखल, उष्णतेपासून मिळणार दिलासा

5

नवी दिल्ली, 17 मे 2022: देशभरातील लोक कडाक्याच्या उन्हाळ्यामुळं अस्वस्थ झाले होते, यातून आता दिलासा मिळणार आहे. अखेर मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान खात्याने (IMD) म्हटलंय की मान्सून काल अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर पोहोचलाय. तसेच केरळमध्येही लवकरच मान्सून दाखल होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील बहुतांश भाग कडक उन्हामुळे रखरखत होता. दिल्ली आणि यूपीमध्ये रविवारी कमाल तापमानाने 49 अंशांचा टप्पा पार केला. मात्र, दिल्लीसाठी आनंदाची बातमी देत ​​हवामान खात्याने सांगितलं की, तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होईल.

हवामान खात्याचे अधिकारी आरके जेनामानी यांनी सोमवारी सकाळी मान्सूनबाबत दिलासादायक माहिती दिली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “मान्सून आज अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर पोहोचला आहे. आम्ही केरळसाठी अंदाज वर्तवला आहे की तो 27 मे च्या आसपास येईल. त्यामुळं प्रगती आणि सर्व निरीक्षणानुसार मान्सूनबाबतचा आपला अंदाज खरा ठरणार असल्याचं दिसून येतं.

आदल्या दिवशी (रविवार) विविध राज्यांतील तीव्र उष्णतेचा संदर्भ देत आरके जेनामानी म्हणाले की, काल उष्णतेची लाट फार गंभीर होती. आज आपण पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांच्या तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसची घसरण नोंदवत आहोत. उद्या अनेक मोठ्या भागातून उष्णतेची लाट संपेल. त्याचबरोबर 17 मे पर्यंत कुठेही उष्णतेच्या लाटेचा कहर होणार नाही. दिल्लीतील हवामानाबाबत ते म्हणाले, मार्च महिना असामान्य होता. संपूर्ण भारतात 122 वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. महिन्यातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान एप्रिलमध्ये नोंदवले गेले. मे महिन्यातील पहिले 10 दिवस चांगले गेले. त्यामुळे हा महिना फारसा असामान्य असेल असे मला वाटत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा