मान्सूनचे मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला आगमन, प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांची माहिती

पुणे,दि, १६ मे २०२३ -: राज्यासह देशाचे लक्ष लागून असलेला यंदाचा मान्सूनचे जूनच्या पहिल्याच आठवड्यात आगमन होणार आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पर्जन्यराजाचे आगमन होणार असल्याची बातमी हवामान विभागाने दिली आहे. यावर्षी सरासरी ९६ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी वृत्तसंस्थेला मान्सूनबाबत माहिती दिली. त्यानुसार मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.

एप्रिल महिन्या अखेरपर्यंत राज्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत होता. मे महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून मे हिटचा तडखा बसत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली असताना बरेच जागी तापमानाने चाळीशी पार केले आहे. विदर्भ आणि खान्देशातील तापमानाचा पारा ४४ अशांवर गेले आहे. वाढत्या तापमानापासून कधी दिलासा मिळणार ? मान्सून कधी येणार ? याकडे शेतकरी वर्गच नाही तर सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. अशातच हवामान खात्याने मान्सून बाबत दिलासादायक माहिती दिली आहे.

आज वरच्या दिर्घकालीन अंदाजानुसार राज्यात ९६% पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनची पुढील माहिती येणार आहे. यानंतर पुढील चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती या महिना अखेरीस देण्यात येणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा