राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार, हवामान विभागाची माहिती

पुणे, ३० मे २०२३ : मे महिना संपून उद्यापासून जून महिना सुरू होत आहे आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. मान्सूनपूर्वी पडणारा पाऊस म्हणजेच वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात चांगली वार्ता दिली आहे. मान्सूनने आगेकूच सुरु केली असून मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे.

नैऋत्य मान्सूनने आता पश्चिम बंगालच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. आग्नेय BoB, संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, अंदमान समुद्र, काही भाग पूर्वमध्यचा बंगालचा उपसागराकडे सरकला आहे. दोन दिवसात मान्सूनची आगेकूच केरळकडे होणार आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सूनची प्रगतीला कोणताही अडथळा आला नाही तर मानसून १० जून रोजी कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकणात ८ ते १० जूनपर्यंत मान्सून सक्रीय होण्यार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल अशी माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्याची चाहूल लागली आहे. कारण आकाशात काळे ढग भरून यायला सुरुवात झाली आहे. यामुळे मान्सून सक्रीय होण्याचे संकेत कोकणात मिळू लागले आहेत.

१० जून रोजी मान्सून महाराष्ट्रात येणार आहे. त्यानंतर १६ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचेल. परंतु मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करु नये. मान्सून स्थिरावल्यावर पेरणी करावी. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा