मोरबी दुर्घटना : ममता बॅनर्जी म्हणाल्या…

कोलकता, २ नोव्हेंबर २०२२ गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेने संपूर्ण देश आणि जग हादरले. जगभरातील लोकांनी यावर शोक व्यक्त केला. तसेच देशातील अनेक बड्या नेत्यांनी याला राजकीय स्वरूप न देण्याचे आवाहन देखील केले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल चिंता आणि शोक व्यक्त केला असून जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली आहे. या घटनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मी यावर भाष्य करणार नाही कारण राजकारणापेक्षा लोकांचा जीव अधिक मोलाचा आहे.

न्यायिक समितीद्वारे या घटनेची चौकशी करावी

पुढे त्या म्हणाल्या, ही दुर्घटना घडून गेली असली तरी या प्रकरणी सरकारला उत्तर हे द्यावेच लागणार आहे. त्यामुळे मोरबी दुर्घटनेची चौकशी होणे गरजेचे असून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरही निशाणा साधला आहे. गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेप्रकरणी ईडी, सीबीआय आणि अन्य एजन्सी जबाबदारांवर कारवाई का करत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

CAA ला पूर्णपणे विरोध

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुजरातमध्ये पुन्हा एकदा सीएएच्या मुद्द्यावर बोलताना सांगितले की, आम्ही याच्या पूर्णपणे विरोधात आहोत, आणि आम्ही सीएएला विरोध करतो, गुजरात निवडणुकीमुळे भाजप हा खेळ खेळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, मोरबी पूल दुर्घटने आत्तापर्यंत १३५ लोकांनी जीव गमावला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर अनेक जण बेपत्ता देखील आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा