चोपडा, जळगाव २१ जानेवारी २०२४ : महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून मुंबई च्या दिशेन निघालेला मराठा समाज हा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. चोपडा तालुक्यातील मराठा समाज हा सुद्धा पुर्ण ताकदीने जास्तीत जास्त संख्येने कसा मुंबईच्या आंदोलनात सहभागी होईल, या संदर्भात चर्चेसाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील समाज बांधव एकत्र आले आणि त्यांनी यावर चर्चा केली.
आपल्या हक्काच्या न्याय हक्कासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी मुंबई येथे जावून मनोज जरांगे पाटील आम्ही सुध्दा खान्देशातील मराठा समाज तुमच्या लढ्यात सामील आहोत. हे दाखवण्यासाठी मुंबई येथे खाजगी वाहृनांनी समाज बांधव जाणार आहेत. त्यासाठी चोपडा येथे समाजाची एक मिटींग घेण्यात आली. या मिटींग ला प्रमुख पाहुणे म्हणून रोहित निकम, अमृतराव वाघ, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, अतुल ठाकरे, पी .बी.रावसाहेब, तुकाराम पाटील, रोहिणी पाटील, मिना पाटील, भटू पाटील, किरण करंदीकर यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
न्युज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील