नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” मन की बात” ला ३ लाखांहून अधिक डीसलाईक आले आहेत. आपण पाहतो की पंतप्रधान मोदींची अनेक भाषणं हिट होत असतात. त्यांच्या भाषणांना सभास्थळी तोबा गर्दी होते, तसंच टिव्ही वरही लाखोंच्या संख्येने लोक त्यांची भाषणं पाहत असतात. मात्र काल ‘ मन की बात ‘ मधून पंतप्रधान मोदींनी देशवासीयांसाठी साधलेला संवाद लोकांच्या पसंतीचा भाग उरलेला नाही आहे. ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला डीसलाईक्स केले आहे आणि अजून हि डिसलाईक्स वाढतच आहेत.
तसेच आपल्याला माहीतच आहे नरेंद्र मोदी हे रेडिओ चद्वारे जनतेशी संवाद साधत असतात आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या यूट्यूब चॅनेल वरून हा व्हिडिओ प्रक्षेपित करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ ११ लक्ष लोकांनी पहिला आहे तसेच ३६ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला नापसंद करत डीसलाईक्स केले आहे.
तसेच सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या कालच्या मन की बातची भलतीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओच्या खाली येणाऱ्या कमेंट्सने देखील एकच चर्चा सुरू झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे