दोन बसेसच्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

रत्नागिरी,१२ सप्टेंबर २०२२ : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर येथे दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या घटनेमध्ये बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये बसमध्ये असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

चिपळूण धोपावे आणि गुहागर डेपो मधल्या या बसेस होत्या. दोन्ही बसेस एका अवघड वळणावर समोरासमोर आल्या आणि त्यांची धडक झाली. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले . तसेच अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु घटनास्थळी सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. गुहागर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतीचे बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा