सौर कृषीपंप योजनेचा लाभ ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतला…

सोलापूर, २१ ऑगस्ट, २०२० : महाराष्ट्रात अजूनही अशी गावं आहेत जेथे शेतकऱ्यांना योग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यातूनच एक म्हणजे विजेचा पुरवठा, लोडशेडींग असल्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री जावं लागतं. हे काम दिवसा व्हावं आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना आणली आहे.

याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतला आहे तसेच महावितरणाचे अधीक्षक ज्ञानदेव पडळकर यांनी सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २०४ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा