गोल पोस्ट आरोग्य राज्यात काल दिवसभरात कोरोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिकजण करोनामुक्त

राज्यात काल दिवसभरात कोरोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिकजण करोनामुक्त

मुंबई, 20 सप्टेंबर 2021: राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसली, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या काल दुपटीहून अधिक आढळून आली आहे. काल 3,413 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 36 हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.16 टक्के आहे.

राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 42 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,70,28,476 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,21,915 (11.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,81,561 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,752 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 720 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरु 1725 रुग्ण आहेत. तर नवे रुग्ण 145 आढळले आहेत. पुण्यात एकूण रुग्णांचा आकडा 4,99,373 वर गेला आहे. काल 197 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 4 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 523 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 36 हजार 018 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 30 हजार 773 नव्या रुग्णांची भर पडली असून 309 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये 38 हजार 945 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली होती तर 281 लोकांचा मृत्यू झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version