गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई

मोरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई

बारामती: मोरगाव जवळील तरडोलि गावात अवैध जुगारीचा अड्डा सुरू असल्याची माहिती गोपनीय विभागाला मिळाल्यावर आहे. अशी माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना खबऱ्यांमार्फत मार्फत मिळाली असता गोपनीय विभागाचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांनी सापळा रचुन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने छापा मारला असता तरडोली येथील पत्र्याच्या शेड मध्ये खेळणाऱ्या १५ जनांसह जुगरीच्या अड्ड्याचे चालक १) अमोल किसन मदने २) बाळासाहेब वांजळे ३) लोणकर ( पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये ७९,३५० रुपये रोख, लाकडी टेबल, खुर्च्या,१३मोबाईल हँडसेट, ८ मोटारसायकल, चारचाकी टाटा सफारी कार असा एकूण ६ लाख ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाई मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस चंद्रशेखर यादव, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील १० पुरुष २ महिला जवान तसेच वडगाव निंबाळकरचे पोलिस राजाराम साळुंखे,संजय मोहिते, आदींनी कारवाई मध्ये सहभागी झाले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version