मोरोक्को भूकंपाने हादरले, अनेक इमारती कोसळून २९६ जणांचा मृत्यू

पुणे, ९ सप्टेंबर २०२३ : मोरोक्कोमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती. यासोबतच या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचंही बोललं जात आहे. या जोरदार भूकंपामुळे नागरिकांमध्ये हाहाकार उडाला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये काल रात्री उशिरा ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत २९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५३ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यूएस स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भागात १२० वर्षांतील हा सर्वात तीव्र आणि शक्तिशाली भूकंप आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याचं मोरोक्कनच्या सरकारी दूरचित्रवाणीनं सांगितलं.

भूकंपाचा केंद्रबिंदू एटलस पर्वताजवळील इघिल नावाचे गाव असल्याचे सांगण्यात येत आहे. जे माराकेश शहरापासून फक्त ७० किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपाची खोली जमिनीपासून १८.५ किलोमीटर खाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा