गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा आईने बडबड केल्याने मुलाने केली आत्महत्या

आईने बडबड केल्याने मुलाने केली आत्महत्या

आंबेगाव:वडगाव काशींबेग ता.आंबेगाव येथे राहणाऱ्या २० वर्षीय ऋतिक सुरेश मानकर या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आसुन.याबाबत त्याचा भाऊ दत्तात्रय सुरेश मानकर यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि,१ रोजी ऋतिक सुरेश मानकर याला त्याच्या आईने अभ्यास करत नाही सतत मोबाईल घेऊन बसतो यावरून बडबड केली असता तो घरातून निघून गेला बराच वेळ होऊनही तो घरी आला नसल्याने त्याच्या आईने त्याचा भाऊ दत्तात्रय याला फोन करून ऋतिक ला मी बडबड केल्यामुळे तो दुपार च्या सुमारास घराबाहेर निघून गेला आहे तो अजून घरी आला नाही तो आपल्याला मिळालेल्या इंदिरा आवास घराकडे गेला असून तू येताना त्याच्याकडे जाऊन ये असे सांगितले दत्तात्रय त्या घरी गेला असता ऋतिक ने राहत्या घरात अँगल ला फेट्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.त्याने लगेच फेटा कापून त्याला खाली घेऊन मित्राच्या मदतीने खाजगी वाहनातून मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे, पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस करत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version