फलटण तालुक्यातील पवारवाडी येथे माय लेकीची आत्महत्या

फलटण, सातारा २३ सप्टेंबर २०२३ : फलटण येथे प्रियकराच्या साथीने पतीचा खून केल्याची ताजी घटना असतानाच काळ पुन्हा एकदा एक दुःखद घटना तालुक्यात घडली आहे. काल शुक्रवारी गौराईचे आगमन झालेलं, गौरी पूजनाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाची धामधूम परंतु सकाळीच फलटण पूर्व भागातील गोखळी, पवारवाडी गावामध्ये माय लेकीने विहिरीत आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली.

एकअल्पवयीन मुलगी व तिच्या आईने आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. स्वतःच्या विहिरीमध्ये मायलेकींनी आपले जीवन संपवले होते.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, पवारवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या बटई नावाच्या शिवारात विहिरीमध्ये उड्या मारून माय लेकीने जीवन संपवले. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुखदेव मिंड, त्याची पत्नी राधा मींड, गणेश मिंड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी चा मुलगा गणेश मिंड याने संबधित आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास भाग पाडले होते. दिनांक २१/०९/२०२३ रोजी मुलीला फलटण येथे नेऊन तिच्यावर तिच्या इच्येविरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध केले .सुखदेव मिंड याने आपल्या मुलाचे संबंधित मुलीबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने संबंधित मुलगी आणि तिच्या आईने सकाळी नऊ वाजता पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या स्वतःच्या शेतातील विहीरी मध्ये उड्या मारून आत्महत्या केली. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून आरोपींवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास बरड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रानगट करत आहे.

सगळीकडे गौराईची व गौरीपूजन ची धामधूम सुरू असतानाच या घडलेल्या घटनेने फलटण पूर्व भागात खळबळ उडाली असून मायलेकींवरती गोखळी येथील स्मशानभूमीत सायंकाळी उशिरा, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा बोध आता तरी पालकांनी घेऊन आपल्या अल्पवयीन मुला-मुलींवर लक्ष ठेवणे काळाची गरज असून मोबाईल पासूनही परावृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या पालकांनी लढवाव्यात, तसेच त्यांना योग्य ते शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील राहावे अशा गोष्टीच होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी :आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा