आईला कोरोना,मुलाची आत्महत्या….

नाशिक, दि. १८ जुलै २०२० : आईला कोरोना झाल्याचं समजल्यानंतर २३ वर्षीय मुलाची आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या रोकडोबा वाडीत हा दुर्दैवी प्रकार घडला. संबंधित महिलेवर मागील काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. उपनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील सेंटरमध्ये उपचार सुरु होते. २३ वर्षीय मुलाला आपल्या आईला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं. यानंतर त्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली.या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना तात्काळ पाचारण केले. उपनगर पोलीस सध्या सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.आईला कोरोना झाल्याचं समल्यानंतर आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या आत्महत्येनंतर या भागात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेच्या इतर बाजूही तपास करत आहेत.

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरु आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ५८८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. नाशिक शहरात ४०७ तर ग्रामीण भागात १८१ रुग्ण आढळले आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह आता एकूण मृतांचा आकडा ३७१ पर्यंत पोहचला आहे. नाशिक शहरातील बाधितांची संख्या ५ हजार २४१ वर पोहचली. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८ हजार ६८२ वर गेला.

शुक्रवारी दिवसभरात उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५ हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत २ हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा