आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणानंतर आई गौरी खान ची पहिली प्रतिक्रिया

3

मुंबई, २४ सप्टेंबर २०२२ : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये तब्बल १७ वर्षा नंतर हजेरी लावली होती. या शोमध्ये गौरीसोबत अनन्या पांडेची आई भावना पांडे तसेच संजय कपूर याची पत्नी महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. हा एपिसोड सध्या प्रचंड चर्चेचा भाग बनलेला आहे.

गौरी खान १७ वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर मित्र आणि बॉलीवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या शो मधून पडद्यावर परतली आहे. सोबतच तिने आपल्या खास मित्रांसोबत शो मध्ये खूप धमाल केली, त्याचबरोबर या तिघींनी आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यावर संवाद साधला आहे. गौरीने आर्यन, सुहाना आणि अबराम या आपल्या मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. करण गौरीला आर्यन खान ड्रग केस प्रकरणात अडकला होता. त्याबद्दलही प्रश्न विचारला यावरही गौरीने उत्तर दिले, त्याचबरोबर सुपरस्टार ची पत्नी असल्याने तिच्या कामात अनेकदा नुकसान सहन करावं लागतं असा ही खुलासा केला आहे.

नुकतीच गौरी खानने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या बाराव्या एपिसोड मध्ये हजेरी लावली होती. यात करण ने गौरीला आर्यन खान ड्रग केस प्रकरणात अडकला होता त्याबद्दलही प्रश्न विचारला. त्यावर गौरी उत्तर देत म्हणाली की, एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे कठीण काळातून गेलो. त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही जे घडलं ते एक आई म्हणुन आणि पालक म्हणून बघन यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती आमच्यावर प्रेम करतो ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही त्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, इतकं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आम्ही धन्य आहोत. आमचे मित्र आणि त्याशिवाय त्या काळात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांची मी नेहमीच आभारी राहील.

शोमध्ये बोलताना गौरीने शाहरुख विषयी काही वाईट गोष्टी सांगितल्या. गौरी म्हणाली जेव्हा घरात पार्टी असते तेव्हा शाहरुख गेस्ट ची वाट बघत असतो. तो सारखा घराच्या बाहेर जात असतो. तसेच शाहरुख गेस्ट जाताना ही गाडीत बसेपर्यंत पहात असतो. त्यामुळं घरात पार्टी असली तरी असं वाटतं की पार्टी घराच्या बाहेर सुरू आहे. दरम्यान गौरी खानने आपल्या पतीचे कौतुक पण केले आहे आणि शाहरुख बद्दल सांगितलं की, त्याला टीव्ही पाहणं खुप आवडतं आणि कधी कधी बाथरूम मध्ये बसून पुस्तक वाचायला पण आवडतं. तो खूप मल्टी टास्किंग आहे. त्यामुळे आमच्या मुलांना त्याच्यातला हा गुण मिळायला हवा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा