गोल पोस्ट गुन्हा सासूचे टोमणे, सुनेला राग अनावर डोक्यात घातली बॅट….

सासूचे टोमणे, सुनेला राग अनावर डोक्यात घातली बॅट….

चेंबूर, दि. २० जुलै २०२०: चेंबूरमध्ये सासू सुनेचं नातं म्हणजे नेहमीच काही ना काही नोकझोक ही होतच असते आणि त्यात सासू सुनेचं भांडण तर प्रत्येक घरात पहायला मिळते. ज्यामुळे काही घरगुती हिंसाचार देखील होतात ज्याची काहीच परिसीमा हि नसते. तसेही घरोघरी या मातीच्या चुली असतातच.

चेंबूरमध्ये टिळकनगरमध्ये घडलेल्या एका प्रकाराने संपुर्ण परिसर हादरून गेला आहे. टिळक नगरपरिसरात पेस्टम सागर कॉलनीत एस. आर. ए. इमारतीत सज्जा पाटील म्हणजे सासू ह्या आपला दत्तक मुलगा निलेश पाटील आणि सून संजना पाटीलसह राहत होत्या. निलेश हा कुठेही नोकरीला नव्हता तो रोजच्या दैनंदिन रोजगारावर जायचा आणि सज्जा पाटील ह्या एका मंदिराजवळ भीक मागायच्या. त्यांना मिळेल त्या पैशातून घर चालायचं. सज्जा पाटील नेहमी आपल्या सुनेला यावरून हिणवायच्या. त्यामुळे सूनेला राग अनावर झाला आणि तिने सासूच्या डोक्यात बॅट घातली आणि त्यांची हत्या केली.

घडलेल्या प्रकारावर पडद्या घालण्यासाठी पुढे सुनेने ती बथरुम मधे पाय घसरुन पडल्याची बनावट कथा हि डाॅक्टरांना सांगितली. पंरतु पाेस्टमार्टम रिपोर्ट मधुन खरं काय आहे ते समोर आले. डाॅक्टरांनी पोलिसांना हत्येची माहिती दिली. पोलिसांनी सर्वस्व पणाला लावून तपास सुरु केला आणि सर्व पुरावे हे सुनेकडे बोट दाखवत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले आणि त्यांनी सुनेची पोलिसांच्या राऊडी अंंदाजात चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version