मातृदिन…

१० मे हा दिवस जगभरात मातृदिन म्हणूून साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रीमध्ये आई दडलेली असते. जरी तिने तिच्या गर्भातून बाळाला जन्म दिला नसला तरी तिच्याकडे उपजतच आईपणा असतो. तुम्हाला एखादी मोठी बहीण असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच आला असेल. तुमच्या आयुष्यातील मातृतुल्य अशा व्यक्तिंचा हा खास दिवस आहे. त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्यासाठीच हा दिवस खरतर साजरा केला जातो. या निमित्ताने शाळेतील एक कविता आठवतेय आई .. शाळेत असताना फ.मु शिंदे यांची ‘आई’ नावाची एक कविता होती

‘आई एक नाव असत,
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत

सर्वात असते तेव्हा जाणवत नाही,
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

आई मनामनात तशीच ठेऊन जाते काही,
जिवाचे जिवालाच कळावे असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा,
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा

घर उजळते तेव्हा तीचं नसत भान,
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडत रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही….

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा