सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार तर एक जखमी

बीड, २८ मार्च २०२४ : अंबाजोगाई तालुक्यातील अंबा साखर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे. या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. सुशांत सुनील ठाकूर (वय २३, पाटोदा, म.) ता, अंबाजोगाई व बालाजी भुजबळ (वय – ३०, रा. जोडजवळा, जिल्हा लातूर, असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. तर शिवहर भुजबळ हे जखमी झाले आहेत

अंबा साखर कारखाना ते देवळा रोडवर असलेल्या सातेफळ फाट्यानजीक झालेला अपघात इतका भयानक होता की दोन्ही मोटारसायकलचा हेडलाईटचे अक्षरशः टुकडे झाले. अपघाताची माहिती समजताच परिसरातील कुंबेफळ, सातेफळ, ममदापुर, पाटोदा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुन गित्ते

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा