सात महिन्यानंतर फुटला माउंट सीनाबंग ज्वालामुखी, कोणतीही जीवित हानी नाही

इंडोनेशिया, ३ मार्च २०२१: इंडोनेशियातील सर्वात धोकादायक ज्वालामुखी माउंट सीनाबंग मंगळवारी २ मार्च २०२१ रोजी पुन्हा फुटला. सात महिन्यांनंतर, या ज्वालामुखी स्फोटातील राख आकाशात पाच किलोमीटर उंचीवर गेली. इंडोनेशियातील सेंटर फॉर व्हल्कानोलॉजी नुसार गेल्या वर्षी ऑगस्टनंतर हा पहिला मोठा विस्फोट आहे.

गेल्या वर्षभरापासून व्हॉल्कोनो माउंट सीनाबंग मध्ये हालचाली दिसून येत होत्या. यामुळे उत्तर सुमात्रा प्रांतात दुसर्‍या स्तरावरील सर्वोच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. मात्र, सध्यातरी या स्फोटात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

इंडोनेशियातील व्हल्कानोलॉजी अँड जिऑलॉजिकल हजार्ड मिटीगेशन सेंटर ने फार पूर्वी सीनाबंग ज्वालामुखीच्या आसपासच्या तीन किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना केली होती.

ज्वालामुखीचा पर्वत माउंट सीनाबंग फुटताच सोशल मीडियावर काही चिंतेची झलक दिसली परंतु, काही काळानंतर ती थांबली. स्फोटानंतर आकाशात सुमारे पाच किलोमीटर उंचीपर्यंत राख व गरम धूळ यांचे मोठे लोळ उठताना दिसले.

इंडोनेशिया पॅसिफिक रिंग ऑफ फायर या क्षेत्रात येतो. हे क्षेत्र भूकंपीय हालचालींसाठी बहुचर्चित आहे. या भागात जगातील अनेक टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकत असतात. अनेक वेळा यांच्या तणाव, घर्षण आणि धडक यामुळे भूकंप येत असतात. तर अनेक वेळा ज्वालामुखी देखील फुटतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा