‘माउंटन मॅन’ अंकितचे मोठे यश; दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर फडकविला तिरंगा

5

पुणे, ५ फेब्रुवारी २०२३ : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील रहिवासी अंकित सेनने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर देशाचा तिरंगा ध्वज फडकविण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या शुक्रवारी अंकित जबलपूरला परतला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. हातात तिरंगा ध्वज घेऊन तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करीत या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

अंकित सेन (वय २४) हा जबलपूर जिल्ह्यातील माझौली तहसीलच्या पडरिया गावचा रहिवासी आहे. तो अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलेल्या अंकितचे पोलिसांत डीएसपी होण्याचे स्वप्न आहे. अंकितचे वडील मजुरीचे काम करतात. अंकित म्हणतो, की गिर्यारोहक बनणे त्याच्यासाठी कधीच सोपे नव्हते. तरीही त्याने ज्या वाटेवर पाय ठेवला आहे तो मार्ग त्याला इतरांपेक्षा वेगळा बनवितो. जबलपूर शहरातील माउंटन मॅन अंकित सेन यांनी २०१४ पासून गिर्यारोहण क्षेत्रात विविध यश संपादन केले आहे.

२०१७ मध्ये माउंटन मॅन अंकित सेन, जो मूलभूत आणि प्रगत गिर्यारोहण कोर्स करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे. त्याने उत्तराखंडच्या गढवाल हिमालयन माउंट ‘जोगिन’वर देशाचा तिरंगा ध्वज फडकविला ज्याची उंची ६,११६ मीटर आहे. यानंतर २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशच्या ‘उन्नाम’ पर्वतावर देशाचा तिरंगा फडकविण्यात आला, ज्याची उंची ६,१११ मीटर आहे. १९ ते २९ जानेवारी या कालावधीत माउंट ‘किलीमांजारो’ आफ्रिकेत आयोजित केलेल्या गिर्यारोहण शिबिरात भाग घेतला आणि २३ जानेवारीपासून चालण्यास सुरवात केली.

प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१० वाजता दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. असे करणारा अंकित हा मध्य प्रदेशचा पहिला गिर्यारोहक ठरला आहे. त्यानंतर आता अंकितचे स्वप्न जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’ सर करण्याचे आहे. अंकित सेनने सांगितले, की जेव्हा त्याने शिखरावर चालायला सुरवात केली तेव्हा तेथील तापमान उणे १६ अंश होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा