हैद्राबाद, १७ ऑगस्ट २०२०: २०२० हा सालच बाॅलिवूडसाठी वाईट ठरताना दिसतोय. एका मागे एक दिग्गज दिग्दर्शक, कोरियोग्राफर अभिनेते, अभिनेत्री यांनी जगाचा निरोप घेतले आहे. या वर्षाच्या सुरवतीपासूनच बाॅलिवूडवर शोककळा पसरली आहे. आता त्यात आणखी एका दिग्दर्शकाने बाॅलिवूड मधून एक्झिट घेतली आहे.
दिग्दर्शक निशिकांत कामत हा गेल्या अनेक दिवसापासून यकृताच्या आजरानें त्रस्त होता. हैद्राबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सरु होते. तर त्याची प्रकृती हि आधीपासूनच चिंताजनक होती. त्यातच उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांनी हैद्राबाद येथील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी मदारी, दृश्यम, मुंबई मेरी जान, डोंबिवली फास्ट, फुगे, लय भारी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत त्या बरोबरच सातच्या आत घरात, राॅकी हॅण्डसम, जुली २, भावेश जोशी, मदारी या चित्रपटातून अभिनय देखील केला होता. त्याच्या अशा जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी बरोबर बाॅलिवूड चित्रपटसृष्टीत ही शोककळा पसरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी