जेजुरी (पुरंदर), दि. १० जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे असलेले कोवीड केअर सेंटर जेजुरी बाहेर मोकळ्या जागेत हलवावे, अशी मागणी जेजुरी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी केली आहे. हे कोविड केअर सेंटर भविष्यात जेजुरीकरांसाठी धोकादायक ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये सध्या कोरणा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पुरंदर तालुक्यामध्ये आत्ता पर्यंत १६७ कोरना रुग्ण आढळून आले आहेत. यातील रूग्णांना जेजुरी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे या रुग्णांचे नातेवाईकांची जेजुरी मध्ये गर्दी होताना दिसते आहे. या लोकांचा संपर्क जेजुरीतील नागरिकांबरोबर येत असून त्यामुळे जेजुरी मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. आता जेजुरीतही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जेजुरीतील कोवीड केअर सेंटर हे जेजुरी बाहेरील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात यावे. अशी मागणी जेजुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई ग्रामस्थ अलका शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर येथील कोवीड केअर सेंटरमधील काही लोक जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या पहिल्या पायरीचे दर्शन करून येत असल्याची तक्रार लोक करीत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
जेजुरी येथे एका लॉजमध्ये हे कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे. हे सेंटर हे बसस्थानकापासून व मुख्य रस्त्यापासून जवळ आहे. रुग्णांच्या वाहतुकीसाठी हे ठिकाण योग्य आहे म्हणून प्रशासनाने याची निवड केली. त्याचबरोबर या लॉजमध्ये खोल्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. याचा फायदा जास्तीत जास्त रुग्ण ठेवण्यासाठी होईल या मागची भूमिका होती. मात्र पुरंदर तालुक्यात कोवीडची रुग्ण संख्या वाढत गेली तसे तसे या सेंटरमधील रुग्णांची संख्या सुद्धा वाढली.
सासवड येथील सेंटरमधील रुग्ण संख्या जास्त झाल्याने त्या भागातील रुग्ण या सेंटरमध्ये आणण्यात येत आहेत. एखाद्या रुग्णाच्या बेफिकीरपणामुळे व लोकवस्ती जवळ असल्यामुळे जेजुरी मध्ये कोणाचा संसर्ग वाढू शकतो अशी शंका लोक घेत आहेत. जेजुरी नगर परिषदेच्या माध्यमातून सुद्धा या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल आणि हे कोवीड केअर सेंटर जेजुरीतुन दुसरीकडै हलवण्यात येईल का याबाबत चाचपणी सुरू असल्याचे असे जेजुरीचे नगराध्यक्षा विना सोनवणे यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे