माढा तालुका काँग्रेसच्या वतीने कांदा निर्यात बंदी च्या विरोधात आंदोलन

5

माढा, दि.17 सप्टेंबर २०२०: माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कांदा निर्यात बंदी च्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नेते दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी खुप कष्ट करून सतत मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने कांदा पिक कसेबसे हाताला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा मोठा निर्णय घेतला यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात माढा तालुका काँग्रेस च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून आंदोलनास सुरुवात केली.

यावेळी तालुकाध्यक्ष सौदागर जाधव,युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शाहू जगताप, जहीर मनेर,माढा नगरपरिषदेचे नगरसेवक लंकेशवर गंगाधर पवार, हमीद शिकलगार, अशोकराव पाटील , इत्यादी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा