नामांतराच्या विरोधात सुरू असलेलं साखळी उपोषण मागं, खासदार जलील यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर, १९ मार्च २०२३: औरंगाबादच्या नामांतरावरून एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील मागील १४ दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले होते. काल अखेर हे साखळी उपोषण मागं घेण्यात आल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

आम्ही आंदोलन मागं घेत असलो तरी येत्या काळात न्यायालयाच्या माध्यमातून नामांतराचा लढा सुरू राहील, छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर उपोषण मागं घेत असल्याचं जाहीर केलं. काही संघटनांकडून शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळं उपोषण मागं घेत असल्याचं खासदार जलील म्हणले आहे.

एमआयएमच्या विरोधात आणि छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ मनसे, हिंदू संघटनाही मोर्चा काढत आहेत. मोर्चा दरम्यान हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर भडकवू नका असं आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा