गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंना खासदार प्रीतम मुंडेंकडून अभिवादन

बीड, दि.३ जून २०२०: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

माजी आमदार पंकजा मुंडे यांनी या अगोदरच कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची दुसरी कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत वडिलांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा आवडता पुरण पोळीचा नैवेद्यही त्यांच्या समाधीस्थळी ठेवण्यात आला होता.

यावेळी प्रीतम मुंडे यांच्यासोबत आमदार सुरेश धस यांच्यासह आदी नेत्यांनी उपस्थिती होते .

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा