खासदार श्रीकांत ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई, २५ ऑक्टोबर, २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हापासून मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं होतं. पण नंतर आपण एकटे जाणार असं सांगून त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

पण आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जर मनसे आणि शिंदे गट एकत्र आला तर पुन्हा एका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसणार हे नक्की. पण त्यामुळे शिंदे आणि भाजप गटाची ताकद नक्की वाढेल. उद्धव ठाकरे अजून महाविकास आघाडीच्या मदतीने पुढे जाण्याची भाषा बोलत आहे. पण काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नक्की काय घडू शकेल हे सांगणं कठीण आहे. पण त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजूनही महाविकास आघाडीत असूनही भक्कम पक्ष म्हणून पुढे आला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अजूनही हवा तसा सपोर्ट मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट नक्की काय साधणार हे पहाणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा