नुपूर शर्मासारखी राज्यपालांवर तत्काळ कारवाई करण्याची खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी

पुणे, १३ डिसेंबर २०२२ : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या बाबतीत तत्काळ कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई राज्यपालांवर आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींवर करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आज पुण्यात मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये खासदार उदयनराजे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सांगितले, की मी जेव्हा रायगडावर गेलो तेव्हा तिथे मला प्रचंड वेदना झाल्या. काही लोक कारण नसताना शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानं करतात. महाराजांचा सन्मान झाला पाहिजे, ही सांगण्याची वेळ आली आहे‌.

नुपूर शर्माच्या बाबतीत जशी कारवाई करण्यात आली तशीच कारवाई राज्यपालांवर तत्काळ करावी, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात पुणे शहरातील सर्व संघटना एकवटल्या आहेत. यामुळे आज ‘पुणे बंद’चा मोठा परिणाम दिसून आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा