खासदार व आमदारांनी केली क्वारंटाईन कक्षाची पाहणी

2

उस्मानाबाद, २ ऑगस्ट २०२० : उस्मानाबाद शहराच्या पाठोपाठ कळंब तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कळंब शहरातील कल्पना नगर व मुलींचे शासकीय वसतिगृह या क्वारंटाईन कक्षाची खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी काल दिनांक १ ऑगस्ट रोजी पाहणी केली.

या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांना देण्यात येणारा नाष्टा, जेवण, औषधे व ईतर सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच, त्यांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतीत कसल्याही प्रकारे तक्रार येऊ नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिल्या.

यावेळी उस्मानाबादचे नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, नायब तहसिलदार असलम जमादार, कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दराडे, आरोग्य कर्मचारी, महसुल कर्मचारी तसेच संबंधित अधिकारी देखील तेथे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा