मृत्युदंडाच्या शिक्षेला मुशर्रफ यांचे आव्हान

36

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करी हुकुमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी शनिवारी (दि.२८)रोजी आपल्याविरोधातील देशद्रोहाच्या खटल्याच्या निकालाला आव्हान दिले. इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने ७६ वर्षीय मुशर्रफ यांना या खटल्याच्या निकालामध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे.
गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांच्या अनुपस्थितीतच सहा वर्षांपासून चाललेल्या या प्रकरणाचा निकाल सुनावला होता.
मुशर्रफ यांच्यातर्फे वकील अजहर सिद्दिकी यांनी लाहोर उच्च न्यायालयामध्ये ८६ पानांची याचिका दाखल केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा