महावितरणाची हिरकणी ठरली महाराष्ट्र गौरव पुरस्काराची मानकरी

बीड, २९ जुलै २०२०: एरवी महिला कर्मचारी म्हटलं की प्रत्यक्ष साईट पेक्षा कार्यालयीन कारकुनी कामं करण्याची मानसिकता आजही कमी झालेली नाही. महावितरणची कडा (ता. आष्टी, जि. बीड) येथील महिला तंत्रज्ञ (लाईन स्टाफ) उषा जगदाळे मात्र, या सार्वत्रिक मानसिकतेला अपवाद ठरलीय. महिला म्हणून कार्यालयीन पोस्टींगही मिळवू शकणाऱ्या उषाने मात्र आपल्या कामाचे स्वरुप ओळखून प्रत्यक्ष साईटवरच काम करण्याचा निर्णय घेतला. महिला असूनही ती तरबेजपणाने पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणे खांबावर चढते. विजेची सर्व कामे करते. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकट काळात देखील ती सातत्याने कार्यरत राहिली व वीज पुरवठा खंडित होऊ दिला नाही.

आता त्यांच्या या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. महावितरणच्या सेवेत असणाऱ्या उषा जगदाळेचा पेशा वीज तंत्रज्ञ म्हणून असला तरी मुळ मात्र खेळात आणि कुळ शेतकऱ्यांचे. खो-खो खेळात अनेकवेळा मानकरी ठरलेल्या उषाने शालेय जीवनात सुवर्णपदक मिळवले होते.

वडिल भाऊसाहेब जगदाळे. देवी गव्हाण (ता. आष्ठी जि. बीड) येथे त्यांची तीन एकर कोरडवाहू शेतीचा एकमेव व्यवसाय, घरात आईसह थोरली मुलगी उषा, तिच्या पेक्षा अनखी एक लहान मुलगी अन् त्यानंतरचा सर्वात लहान भाऊ. शेती केवळ निसर्गाच्या भरवशाची.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा