महावितरणचा भोंगळ कारभार;लेखी तक्रारी नंतरही कारवाई नाही.

5

पुरंदर, दि.५ जुलै २०२० : महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या वेगवेगळ्या घटना सतत घडत असतात. तशीच घटना आज उघडकीस आली आहे. मागील दहा वर्षापासून एक महाभाग थेट खांबावरील तारांवर आकडे टाकून घरगुती व बोरवेलसाठी वीज चोरून विना मिटर वापरत आहे. यासंबंधीची तक्रार एका सजग नागरिकांनी केली आहे. तरीही वीज वितरण कंपनी कोणतीही कारवाई करीत नाही.

नीरा नजिकच्या कोळेवस्ती येथील एका घराला अवैध पद्धतीने वीज कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आल्याने नीरा येथील रहिवासी पोपट सतीश धायगुडे यांनी महावितरणच्या नीरा येथील उप अभियंता कार्यालयात ३० जून रोजी व बारामतीच्या अधीक्षक अभियंत्यांना १ जुलै रोजी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यानंतर अद्यापही त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नसून आजही तो आकडा तसाच आहे.

या वीज चोरीकडे महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत . याबाबत महावितरण कर्मचाऱ्यांन माहिती असून संगनमताने वीज चोरी होत असल्याचा आरोप पोपट धायगुडे यांनी केला आहे. अशा प्रकारच्या चोरांचा भुर्दंड वीजगळतीच्या नावाखाली नियमित वीज भरणा करणाऱ्या ग्राहकांना करावा लागतो. त्यामुळे जे लोक अधिकृतपणे वीजवापर करतात त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे.

असे राजरोस पणे असे वीज चोरीचे प्रकार होत असतील तर महावितरण प्रशासन कुठे कमी पडते? की चोरी करणारे व महावितरण कर्मचारी यांची हितसंबंध आहेत का?याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हायला पाहीजे. वीज चोरी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोपट धायगुडे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपअभियंता नीरा शाखा व अधीक्षक अभियंता बारामती यांचेकडे केली असून अद्यापही कोणतीच कारवाई होत नसल्याने यांनी नाराजी व्यक्त करत पुढील काळात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा