राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार (MSP) आता कडधान्य आणि तेलबियांची शासकीय खरेदी सुरू झाली आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघाच्या माध्यमातून मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर यांची खरेदी केली जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळण्याची खात्री मिळाली आहे.
ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ‘ई-पीक पाहणी’ करणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याने ऐनवेळी अडचणी येतात. त्यामुळे, सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी आणि ७/१२ उताऱ्यामध्ये त्याची नोंद असल्याची खात्री करावी.
यावर्षी जाहीर झालेले हमीभाव खालीलप्रमाणे आहेत
- तूर: २,३६७ रुपये प्रति क्विंटल
- मूग: ७,८०० रुपये प्रति क्विंटल
- उडीद: ७,४०० रुपये प्रति क्विंटल
पीक कापणी अहवाल आल्यानंतर खरेदीसाठी मर्यादा ठरवली जाईल. त्यामुळे, शेतकऱ्यांनी वेळेत सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. ही खरेदी शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी असून, यामुळे त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































