मुकेश अंबानी बनले अशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ” रिलायन्स जिओ” या भारताती मोठ्या टेलिकॉम कंपनीत जगातील मोठी सोशल मीडिया कंपनी “फेसबुक” ने मोठी गुंतवणूक केली आहे. फेसबुक-जिओ करार मंजूर होताच या मंदीच्या काळातही मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ मध्ये फेसबुकने ९.९९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. यासाठी फेसबुक ५.७ अब्ज डॉलर्स म्हणजेच, ४३,५७४ कोटी रुपये रिलायन्स जिओमध्ये गुंतवत आहे. फेसबुकच्या जिओ गुंतवणीकीनंतर नंतर मुकेश अंबानी यांची संपत्ती अलिबाबा डॉट कॉमचे संस्थापक जॅक मा यांच्या पेक्षा अधिक झाली आहे. अलिबाबाचे संस्थापक जॅक मा नेटवर्थच्या बाबतीत पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या मागे पडले आहेत.

बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ९.८३ टक्क्यांनी वाढ होवून ते शेअर बाजारात १३५९ रुपयांवर बंद झाले. जिओमध्ये फेसबुकच्या गुंतवणूकीनंतर मुकेश अंबानींची संपत्ती जवळपास ४ अब्ज डॉलर्सने वाढली असून मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास $ ४९ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.

रिलायन्स इंडस्ट्री व फेसबुक यांच्या मधील या व्यवहारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भाग भांडवलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे अंबानींची संपत्ती अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्या तुलनेत सुमारे $ ३ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे अंबानींची संपत्ती १४ अब्ज डॉलर्सने घटली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा