नवी दिल्ली, दि. २३ जुलै २०२०: एकीकडे संपूर्ण देेशात कोरोनामुळे आर्थिक महामंदी चालू आहे तर दुसरीकडे रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. १४ जुलैला अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचले होते. पण, काही दिवसातच म्हणजेच ८ दिवसातच बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांना मागे टाकत जगातील पहिल्या ५ श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे.
मुकेश अंबानी हे पाचव्या स्थानावर पोहचलेले आशियातील एकमेव उद्योगपती आहेत. गेल्या ८ दिवसांत मुकेश अंबानींची संपत्ती तब्बल २.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून. फोर्ब्स बिलेनियर्स लिस्टनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ७५ अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीसोबतच त्यांच्या रिलायन्सच्या उद्योगात भांडवल मधे वाढ होत आहे. रिलायन्सचं बाजार भांडवल सध्या १२,७०,४८०.०६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
मार्च महिन्यापासून रिलायन्स उद्योग समूहाच्या समभागांच्या किमती दुपटीनं वाढल्या असून. काल रिलायन्स उद्योग समूहाच्या समभागाच्या किमतीत १.६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे रिलायन्सच्या समभागाची किंमत २००४.१० रुपयांवर पोहोचली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अँमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस पहिल्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १८५.८ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या संपत्तीचं मूल्य ११३.१ अब्ज डॉलर इतकं आहे. या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट अँड फॅमिली तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचं मूल्य ११२ अब्ज डॉलर आहे. यानंतर फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे ८९ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
भारतासाठी हि एक चांगली बातमी आहे. पण भारतातील अर्थचक्र कोलमडलं आसताना ही मुकेश अंबानींचीे मात्र जगभरात आपल्या संपत्तीच्या किर्ती मुळे चर्चा होताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी