नगर: विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत नगर जिल्ह्यातून भाजपला मोठ्या संख्येने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळाले. त्याचा परिणाम नगर जिल्ह्यातील संपूर्ण भाजपवर झाल्याचे पहायला मिळत आहे.त्यातच काही भाजपच्याच कार्यकर्त्यानी नगरचे खासदार आणि आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दयावे, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवामुळे विखे पिता पुत्रांच्या राजीनाम्याची मागणी सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे.मंत्रिमंडळात विखेंना कोणतेही मंत्रिपद देऊ नये या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडे जोर धरला जात आहे.