मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी राज्यातील बारांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले

36

आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी दारू बंदी घालण्यास उत्सुक असून त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला राज्यातील बार कमी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे सरकारने गुरुवारी सांगितले. शासनाच्या महसुलासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत जगनमोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना राज्यातील बारांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले.
१ जानेवारीपासून सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत बारमधील ग्राहकांना दारू दिली जाईल याची काळजी घ्या, असेही रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा एक सेट तयार करण्याचे आदेश दिले व प्रलंबित कर वसूल करण्याची कार्यवाही तयार करण्याचेही सांगितले, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा