मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर

शिर्डी : मुख्यमंत्री ठाकरे यांनी जन्मस्थानाचा उल्लेख केल्याने पुन्हा भाविक व शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थानाचा उल्लेख केला होता. यावर नाराज साईभक्त व शिर्डीकरांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन साईंच्या जन्मस्थानाचा खुलासा केला होता.
साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. साईसत चरित्रात कुठेही साईबाबांच्या जन्म व जन्मस्थळाचा उल्लेख नाही.
ज्या बाबी ज्ञात नाहीत त्या अज्ञात आहेत. त्याबद्दल अधिकृत बोलणे कठीण वाटते, असे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावर यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा