मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खटल्याची सुनावणी दि. ११नोव्हेंबरला होणार आहे.
त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांवर ४मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ रोजी दोन फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांनी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत या दोन गुन्ह्यांसंदर्भात माहिती दिली नव्हती. याबाबत ऍड. उके यांनी तक्रार दाखल केली होती. यावरुन ही सुनावणी होणार असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.











































